जाफराबाद येथील पत्रकारावर प्राणघात हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर पत्रकार कायद्यान्वये कार्यवाई करा.


  • तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने डुग्गीपार पोलिसांना निवेदन सादर.

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – १४ जून २०२१ – मा. पोलिस महासंचालक मुंबई, मा.पोलिस अधीक्षक गोंदिया जिल्हा, यांना मा. डुग्गीपार पोलिस स्टेशन, तालुका सडक अर्जुनी मार्फत निवेदन सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध! वेक्त करीत सादर करण्यात आले आहे.



दिनांक – ११ जून २०२१ रोजी जाफराबाद येथील पंचायत समिती कार्यालय समोर दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर वामनराव पाबळे यांच्यावर काही वाळु माफीयांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

अवेध वाळु चोरीच्या बातम्या का छापतो म्हणून जबर मारहाण केल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर जण मारहाणीत जखमी झाले आहेत. जखमीवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. पत्रकार ज्ञांनेश्वर पाबळे यांच्यावर औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार सुरू आहे.

समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळु उत्खनन बाबद बातमी प्रकाशित केल्यामुळे त्यांना ही जबर मारहाण झाली आहे. पत्रकारांवर हल्ले होणे ही काही नवीन बाब नाही, दिवसेंदिवस अश्या घटनेत वाढ होत असून वाळु चोरीचा सर्रास प्रकार सर्वत्र सुरु आहे.

सन 2019 च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 29 च्या पत्रकार कायद्यान्वये सखोल उच्चस्तरीय चौकशी करून हा हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन पोलीस महासंचालक मुंबई यांना आज दिनांक – १४ जून रोजी दुपारी डुग्गीपार पोलीस स्टेशन येथील पोलिश उप निरीक्षक पांढरे यांच्या मार्फत देण्यात आला आहे.

या वेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. बबलू मारवाडे, उपाध्यक्ष श्री. अश्लेष माळे, सचिव श्री. सुधीर शिवणकर, मार्गदर्शक श्री. सुशील लाडे, सदश्य आकेश बावनकुडे, सदश्य वेद परसोडकर उपस्थित होते.


 

Leave a Comment