मिना बाजार मालकाने, साकोली नगर परीषदेला बजावली ६ लाख २१ हजार ७५० रुपयांची नोटीस.


  • साहित्य गहाळ प्रकरण आले साकोली नगर परिषदे च्या अंगलट ?


भंडारा, साकोली, ( आशिष चेडगे ) – दिनांक – १४ जून २०२१ – शहरातील होमगार्ड परेड ग्राऊंडवरील मिनाबाजाराची परवानगी कोरोना प्रादूर्भावाने रद्द झाली होती, मालक अशरफ भाटी रा. नागपुर यांचे ६ लाख २१ हजार ७५० रूपयांचे माल साहीत्य गहाळ प्रकरणी मालकाने दि. ४ जून ला नगरपरीषद मुख्याधिकारी यांना माल परत करा किंवा सदर रक्कम १८% व्याजासह ७ दिवसात भरून द्या असे कायदेशिर नोटीस भंडारा अँड शशीर वंजारी यांमार्फत दिले.



सविस्तरपणे असे की – अशरफ भाटी यांनी अम्यूझमेंट पार्क सर्कस व्यावसायातून अनेक गरीब कुटूंबीयांना रोजगार देतात, हा मिनाबाजार दि. २०/२/२१ ते २०/३/२१ पर्यंत सुरू करण्यासाठी मुख्याधिकारी यांना २७/१/२१ ला अर्ज करून ना हरकत पत्र मागितले तसे ९/२/२१ ला संमती मिळाली परवानगी देतेवेळी अशरफ भाटी यांकडून ६५,००० रू घेण्यात आले, मात्र पावती ५ हजाराची दिली पण कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाने तहसिलदार यांनी मिना बाजारास परवानगी नाकारली.

नंतर मुख्याधिकारींनी १९/२/२१ ला संमती रद्द केली, व ग्राऊंड खाली केले नाही म्हणून त्यांवर १ लाख ८० हजारांचा दंड केला व २६ ट्रैक्टर माल साहित्य जप्त केले, मात्र पंचनामा कॉपी मालकास दिली नाही, कॉपी मागितली असता टाळाटाळ केली, नंतर अशरफ भाटी यांनी २५/५/२१ ला १ लाख ८० हजारांचा दंड भरला व माल उचल केला, असता ६ लाख २१ हजार ७५० रूपयांचे माल साहीत्य गहाळ होते, असा आरोप त्यांनी साकोली नगर परिषद वर केला आहे.  आता अशरफ भाटी यांनी नगरपरीषद ला  ४ जून २१ पासून ७ दिवसात माल परत करा किंवा , माल किंमत ६ लाख २१ हजार ७५० रूपये १८% व्याजासह भरून देण्याचे सीपीसी कलम ८० नुसार नोटीस बजावले असल्याने साकोली नगरपरीषद आता अडचणीत आली आहे हे विशेष.! आता ७ दिवसाचा कालावधी लोटला असून यावर काहीच कार्यवाई झाल्याचे चित्र दिसत नाही, त्या मुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क केला असता काही तांत्रिक कारणामुळे संपर्क होऊ शकला नाही.


 

Leave a Comment