प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील : राजकुमार बडोले

  • राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.
  • विविध योजनेंतर्गत १ कोटी ६० लक्ष कामांचे भूमिपूजन.

सडक अर्जुनी, दि. 07 ऑक्टोंबर : माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रांतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील लेखाशिर्ष २५१५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना व इतर योजनेअंतर्गत १ कोटी ६० लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते 02 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाले.

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या विशेष पर्वावर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी तत्पर आहोत, गावाचा विकास झाला तर विधानसभेचा विकास होईल, त्यामुळे विकासापासून कोणीही वंचित राहू नये या साठी सदैव प्रयत्नशील राहू असे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले.

यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, पंचायत समिती सभापती संगिता खोब्रागडे, उपसभापती शालीदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, कृ.उ. बा.स. उपसभापती विश्वनाथ रंहागडाले, संचालिका शारदा बडोले, मोर्चा तालुकाध्यक्ष रंजना भोई, पं.स.सदस्य चेतन वळगाये, पं.स. सदस्या वर्षा शहारे, माजी जि.प. सदस्या शिला चौव्हाण, तुकाराम राणे, परमानंद बडोले, गुड्डू डोंगरवार, विशालजी पर्वते सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें