महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारी : मिथुन मेश्राम

सडक अर्जुनी, दि. 07 ऑक्टोंबर : महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला पाठवुन महाराष्ट्रातील दिवसेंदिवस बेरोजगारीत होणारी वाढ करीत आहेत. दरवर्षी पेक्षा यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांचे भात पीक संकटात आले असून, पाण्यामुळे धानपीकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे होऊनही, अजुन पर्यंत नुकसान भरपाईची घोषणा सुद्धा केली नाही.

दररोजची वाढती महागाईमुळे जनता हवालदिल झाली आहे. गृहिणीचे बजेट बिघडले आहेत. महायुती सरकार स्वतःला सावरण्यासाठी नवनवीन योजनांचे प्रलोभने देत भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरून, आज प्रत्येक वस्तूत महागाईचा उंच कळस गाठलेला आहे. एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्रातील महिलांच्या खाता दर महिन्याला पंधराशे रुपये देते, तर दुसरीकडे महागाईच्या स्वरूपात हिसकावून घेत आहे. यामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकार ही जनतेची नसून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारी सरकार आहे.

असे प्रतिपादन मिथुन मेश्राम यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे नवरात्र उत्सव निमित्ताने आयोजित लावणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रीता लांजेवार यांच्यासह नामदेव चांदेवार, सुरेश शिवणकर, ललीत थेर सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें