लाचखोर! तलाठी अडकला एसीबी च्या जाळ्यात, जमीन फेर फार करून देण्यासाठी मागितली लाच!


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 19 ऑक्टोंबर : शेतीची फेरफार करण्यासाठी चिखली येथील तलाठी यांने शेतकरी तक्रारदार यांना तीन हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच द्यायची मुळीच इच्या नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



तक्रारदार पूरूष, वय ३८ वर्ष, रा. नैनपुर डुग्गीपार, ता. सडक अजुनी येथील असून आरोपी लोकसेवक सुरेन मुन्ना मारगाये वय ३८ वर्ष धंदा नोकरी पद तलाठी त. सा. क्र : १७, चिखली, ता सडक अजुनी, जि. गोंदिया. असे आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार आज 19 ऑक्टोंबर रोजी पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सुरेन मारगाये याने 3 हजार रुपयाची मागणी केली आहे. तडजोडी अंती 2 हजार 500 रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदार हे शेतकरी असून तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांचे नावे नैनपुर शिवारात असलेली सर्वे क्रं : 332 व 333 मधील 0. 34 व 0.54 हे. आर शेती तक्रारदार व त्यांची वहीनी यांच्या नावे बक्षीस पत्र करून दिली असून सदर बक्षीस पत्राची दुय्यम निबंधक सडक अजुनी यांच्या कार्यालयात दि. 26/9/23 रोजी नोंदणी केले आहे. तक्रारदाराने सदर बक्षीसपत्राची नोंदणी प्रत व फेरफाराबाबतचा अर्ज 03/10/23 रोजी तलाठी यांच्या कार्यालयात देउन फेरफार करून देण्याची विनंती केली असता आरोपी यांनी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारादारांच्या वडिलांचे नावे असलेली जमीन तक्रारदार व त्यांची वहीनी यांचे नावाने फेरफार करुण देने करीता 3 हजार रुपये ची लाच रकमेची पंचा समक्ष मागणी करुण तडजोडी अन्ती 2 हजार 500 रुपये लाचेची मागणी करुण आरोपी तलाठी सुरेन मारगाये यांनी पंचासमक्ष लाच स्वीकारली. यातील आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. आरोपीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन – डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विलास काळे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. गोंदिया यांच्या मार्गदर्शनात सापळा कार्यवाही पो.नी. अतुल तवाड़े, पो.नि. उमाकांत उगले, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने कारवाई केली.


 

Leave a Comment

और पढ़ें