शिक्षणाधिकारी यांना शिक्षक मागणीसाठी निवेदन.


  • शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कमिटी डव्वा यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन…

गोरेगाव, दिनांक : १० मे २०२३ : वरिष्ठ प्राथ. शाळा डव्वा, केंद्र गनखैरा प. स. गोरेगाव जि. प. गोंदिया येथे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या कमी आहे. शाळेत इयत्ता ०१ ते ०८ ची एकूण पटसंख्या १७० इतकी असून फक्त पाच शिक्षक कार्यरत आहेत. तसेच शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिकामे आहे. गणित व समाजशास्त्र विषय शिक्षकाचे पदही रिकामे आहे. त्याचप्रमाणे एकमेव असलेले भाषा विषय शिक्षक ही बदली मध्ये दुसऱ्या शाळेत जाणार असल्याचे कळले. त्यामुळे सध्या स्थितीत शाळेत फक्त चार शिक्षक पूर्ण असल्याचे जाणवते अशा परिस्थितीत शाळेतील अध्यापनाचे कार्य प्रभावित होऊ शकते.

म्हणून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत येथील सदस्य व सामाजिक कार्यकर्ते असे सर्व मिळून, निवेदनामार्फत तात्काळ शिक्षकांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे. करिता तात्काळ शिक्षकांची पूर्तता करण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी किरणबाई पारधी सरपंच, इसुलाल कटरे उपसरपंच,  माया बघेले शा. व्य. स. अध्यक्ष, संजय बघेले सामाजिक कार्यकर्ता, शंकरसिंह बघेले ग्रा. पं. सदस्य, छोटेलाल पारधी काँ. क. अध्यक्ष, मोहन रहांगडाले ग्रा. पं. सदस्य, दुर्गा कोल्हे शा. व्य. स. सदस्य, वैशाली वासनिक ग्रा. पं. सदस्य, डीलेस्वरी कोल्हे ग्रा. पं. सदस्य यांनी शिक्षणाधिकारी प्राथ. महेंद्र गजभिये जि. प. गोंदिया यांना दिले. यावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत शिक्षकांची नियुक्ती करणे बाबतचे आश्वासन दिले.


 

Leave a Comment

और पढ़ें