डव्वा येथे ३५ वर्षापासून कुस्ती ची परंपरा कायम, आजी माजी आमदार होते उपस्थित.


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : २७ सप्टेंबर २०२२ : मौजा डव्वा येथे ३५ वर्षापासून दरवर्षी पितृ मोक्ष अमावश्याला हनुमान मंदिराच्या पटांगणात पुरुष कुस्ती दंगल चे कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्याप्रकारे आज २५ सप्टेंबर रोजी ही कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होता. कार्यक्रमाचे उद्गघाटन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे शुभ हस्ते, तर माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी जि.प. सदस्य भुमेश्वर पटले, उप सभापती शालिंदर कापगते, चेतन वडगाये पंचायत समिती सदस्य, एफ आर टी शहा, रूपविलास कुरसुंगे, आनंद जोशी, सचिन राहंडाले, सूर्यभान उंदीरवाडे, अनिल बिलिया, हुमनराव चौधरी पोलीस पाटील, निलध्वज बडोले, मधुकर गावराणे, हितेंद्र बडोले, विलास चव्हाण, कयूम शेख, सफर शेख, संतोष लामकासे, मोंटू चव्हाण, गिरीधर गाते, पांडुरंग चौधरी, हंसराज राऊत, मेघनाथ उंदीरवाडे, भोजराज गावराणे, विवेक राऊत, सह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

कुस्तीत विजयी मल्लांना पाहुण्यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. तर एफ आर टी शहा यांच्या मागणी वरून आमदार महोदयांनी व्यायाम खोली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन मधुकर गावराने यांनी तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्विते साठी जय बजरंग आखाडा मंडळ डव्वा च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


 

Leave a Comment