गोंदिया, दिनांक : 17 सप्टेंबर 2022 : दिनांक 16 सप्टेंबर 2022 ला भवभूती सभागृह गोंदिया येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदियाच्या वतीने शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मा मधुकर काठोळे सर राज्य समन्वयक यांच्या अध्यक्षतेखाली, मा. विनोदभाऊ अग्रवाल आमदार गोंदिया विधानसभा क्षेत्र यांनी उदघाटक म्हणून कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले. पंकजभाऊ रहांगडाले अध्यक्ष जि प गोंदिया, सविताताई संजय पुराम यांनी कार्यक्रमाच्या सत्कारकर्ते म्हणून आदर्श शिक्षक बांधवांचा सत्कार केला.
प्रसंगी पंकज भाऊ रहांगडाले अध्यक्ष जि प गोंदिया यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची बाहुप्रतिक्षित मागणी म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट रुपये 1500 लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मंचावरून केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण झाली आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदीयाने 6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट रुपये 1500 प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी वेळोवेळी निवेदनाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनासमोर ठेवली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाने पंकजभाऊ रहांगडाले, अध्यक्ष जि प गोंदिया, अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांच्याकडे सरसकट प्रोत्साहन भत्त्याची या पूर्वी मागणी केली होती.
त्या संबंधाने मा विरेंद्र कटरे जिल्हाध्यक्ष व मा केदार गोटेफोडे यांनी मा पंकजभाऊ रहांगडाले यांची पुन्हा दिनांक 16 सप्टेंबर 2022 ला याच संदर्भाने भेट घेतली. तसेच किशोर बावनकर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सडक अर्जुनी यांनी पंकज भाऊ रहांगडाले अध्यक्ष जि प गोंदिया, भुमेश्वर पटले जि प सदस्य, शैलेश नंदेश्वर जि प सदस्य व स्थानीक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून शेवटी सदर घोषणेची समेट घडवून आणली. नूतन बांगरे सर व कुंभलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
याचीच फलनिष्पत्ती म्हणून शेवटी पंकजभाऊ रहांगडाले अध्यक्ष जि प गोंदिया यांनी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदिया च्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता रुपये 1500 सरसकट लागू करण्याची घोषणा केली. पंकजभाऊ रहांगडाले यांनी शिक्षक संघाने वारंवार मागणी केल्याचा उल्लेखही यावेळी केला. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नाने गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया ने अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी( प्राथमिक) यांचे आभार मानले.
तसेच महिला आघाडी शिक्षक संघ गोंदिया यांची सर्व जि प शाळेतील आदर्श सौचालयाची मागणीही यावेळी मंजूर केली. जि प प्रशासनाच्या सर्व शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदिया चे अध्यक्ष, सरचिटणीस व संपूर्ण तालुका कार्यकर्ते यांनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल जिल्ह्याचे संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी आभार व्यक्त केला.