गोंदिया पोलिसांचा अभिनव उपक्रम, जिल्हा परिषद शाळेत शेंद्रिय खत प्रकल्पाबाबत मार्गदर्शन.


  • पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनार्थ पो.स्टे. चिचगड यांचे सौजन्याने ग्राम ककोडी येथे जिल्हा परिषद शाळेत
    शेंद्रिय खत प्रकल्पाबाबत मार्गदर्शन.


गोंदिया, दिनांक – १४ जून २०२१ – मा. पोलिस अधीक्षक गोंदिया, विश्व पानसरे साहेब. व मा. अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर साहेब. कॅम्प देवरी, यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून तसेच पोलिस स्टेशन चिचगड यांचे सौजन्याने महाराष्ट्र व छत्तीसगड, सीमेवरील अतिसंवेदनशील, नक्सलग्रस्त, भागातील ग्राम- ककोडी येथील जिल्हा परिषद शाळा, नक्सलग्रस्त व आदिवासी बहुल भागातील विध्यार्थी यांचे प्रमाण जास्त असून यांना गोंदिया पोलिस
दलाकडून ‘ माझी शाळा हरित शाळा (Eco friendly school) पर्यावरण पूरक वातावरण तयार व्हावे व परिसरातील
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी व
रासायनिक खतामुळे होणारे नुकसान भरमसाठ खर्च टाळून त्यांना कल्पकतेची जोड देत मिश्र शेती व इतर शेतीपूरक
उद्योग यांना चालना देण्यासाठी व गोंदिया पोलिस दलाबद्दल सहानभूतीचे वातावरण निर्माण व्हावे.



म्हणून आज दि. १३/०६/२०२१ रोजी मौजा-काकोडी येथे जिल्हा परिषद शाळेत कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून शेंद्रिय खत प्रकल्प बसवला त्याचा वापर शाळेतील झाडे, नवीन प्लॅनटेशन या करिता होणार आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक – मेश्राम सर,
अंबाते सर,’ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केवट जी, व इतर प्रतिष्ठित नागरिक हजर होते, त्यांनी पोलिस विभागाचे या उपक्रमाबद्दल आभार मानले. सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांचे मागदर्शनाखाली सपोनि अतुल तवाडे, पो.शि. संदीप तांदळे/ १ ९ ७ ९, पो.ना, कमलेश शहारे पोलीस स्टेशन चिचगड यांनी केली.


 

Leave a Comment