उमेदवार पोहोचले क्रिकेटच्या ग्राउंड वर

  • डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला शेवटच्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

सडक अर्जुनी, दि. 18 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रहार जनशक्ती पक्ष तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी चे स्वतंत्र उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचे आज दि. 18 नोव्हेंबर रोजी प्रचार दौरा कार्यक्रम सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील त्यांच्या जन्म गावातून प्रचार दौरा सुरू केला. तर सौंदड येथे प्रचार रॅली काढून आज 18 रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचाराची प्रचार रॅली काढून सुगत दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

या शिवाय अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव, कानोली, रामपुरी, जामडी यांच्यासह इतर गावात सुद्धा त्यांच्या प्रचार दौरा कार्यक्रम पार पडला. गावातील नागरिकांकडून शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांच्या प्रचार दौऱ्यात व रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना सुद्धा अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवस पासून तर शेवटच्या दिवसापर्यंत प्रचारात प्रचंड उत्साह दिसून आला.

एवढेच नव्हे तर डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचे ज्या ज्या गावात आगमन झाले त्या त्या गावातील महिलांनी त्यांचे भव्य स्वागत करून ओवाळणी करून या मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापूरे यांना आशीर्वाद दिला. एवढेच नव्हे तर युवा वर्गामध्ये सुद्धा क्रिकेटच्या बॅट विषयी अधिकच आवड निर्माण झाली असून प्रत्येक गावागावापर्यंत आता क्रिकेटची बॅट पोचली असल्याने येणाऱ्या निवडणुकीत बॅट निश्चितच छटकार मारणार अशी चर्चा सुद्धा आता गावागावातील चौका चौकात सुरू झाली आहे.

मात्र प्रत्यक्ष रीत्या आज आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी या गावात क्रिकेटच्या ग्राउंड वर पोहोचून आपल्या कार्यकर्त्यांची बाउंड्री तयार करून क्रिकेटची बॅट फिरविली. यामुळे या विधानसभा क्षेत्रातही आता क्रिकेटची बॅट अधिकच प्रचलित झाली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय व राज्य पक्षांच्या उमेदवारा ना आता धडकी भरू लागली आहे.

Leave a Comment

और पढ़ें