आमचा शिक्का खोटा होता म्हणून तिकीट बदलून राजकुमार बडोले यांना दिली : खा. प्रफुल पटेल

सडक अर्जुनी, दि. 07 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन दि. 07 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते, या बैठकीत खा. प्रफुल पटेल यांनी हजेरी लावत आमचा शिक्का खोटा होता म्हणून ही जागा बदलून राजकुमार बडोले यांना दिली असून बडोले हे सामान्य माणूस आहेत त्यांना राजकारणाचा 15 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची जागा दिली असल्याचे खा. प्रफुल पटेल म्हणाले.

तर या कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करताना माजी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना गेल्या 15 वर्षाच्या राजकारणात आणी मंत्री असताना केलेल्या विकास कामांचा आढावा कार्यकर्त्यांना सांगत पुन्हा एकदा महायुतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा लढण्याची संधी दिली त्यामुळे येत्या काडात रोजगार निर्मिती करणे हा आमचा ध्येय असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले.

दरम्यान शेकडोच्या संख्येत कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती, माजी मंत्री परिणय फुके खा. प्रफुल पटेल महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी मार्गदर्शन करीत येत्या 20 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी च्या घड्याळ चिन्हाचा बटन दाबून विजयी करण्याचे आव्हान राजकुमार बडोले यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें