माजी आमदार गोपाल अग्रवाल यांची कॉग्रेस पक्षात नाना पटोले यांच्या हस्ते घर वापसी

गोंदिया, दि. 14 सप्टेंबर : गोंदिया येथे आयोजित काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नाना पटोले यांच्या हस्ते कॉग्रेस पक्षाचा दुपट्टा घालत घर वापसी केली आहे. गेल्या २५ वर्षा पासून कॉग्रेस पक्षाचे आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभेच्या विकासासाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत गोंदिया विधान सभेची निवडणूक लढविली असता त्याचा पराभव झाला मात्र पाच वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना सुद्धा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या विकासा करिता निधी उपलब्ध न करून दिल्याने गोपाल अग्रवाल यांनी कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज दि. 13 सप्टेंबर रोजी घर वापसी केले आहे. मी भाजप मध्ये प्रवेश केल्याने आपल्या भावना दुखाविल्याने दिलगिरी व्यक्त करीत माफी मागत आगामी विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचा उमदेवार निवडून येईल असा दृढ विश्वास गोपाल अग्रवाल यांनी व्यक्त करीत नाना पटोले हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे सांगितले

तर कॉग्रेस पक्षाच्या वतीने गोंदियात आज भव्य कार्यकर्ता आणि नवनिर्वाचित खासदारानाचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्य्रमाला कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, सुनील केदार माजी मंत्री, खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेवराव किरसान, गोंदिया जिल्यातील कॉग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे, यांच्या शह कॉग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तर गोपाल अग्रवाल यांनी कॉग्रेस पक्षात घर वापसी केल्या मुळे त्यांना शुभेच्या दिल्या,  गोंदियाच्या विकासात आडा घालणाऱ्या नेत्याचा नाव न घेत टीका करीत गोंदिया भंडारा जिल्यातील  विधानसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडीचं निवडून आणेल असा विश्वास नाना पाटोले यांनी व्यक्त केला आहे.

तर येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार येणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला असून सत्तेत येताच शेतकऱ्यांना एक हजार रुपये बोनस देऊ त्यामुळे तुमच्या मुलाच्या पाठीशी तुम्ही ठाम पने उभे रहा असे नाना पटोले उपस्थित नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणाले. असून पुन्हा नाना पटोले जाता जात म्हणाले आम्ही आता देणारे झाले आहोत महाराष्ट्रात फुले शाहू तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांची सरकार लवकरच येणार आहे त्यामुळे तुमचे संधीचे सोने करा आणि आमच्या पाठीशी उभे राहा असे नाना पटोले म्हणाले.

 

Leave a Comment

और पढ़ें