भामटा “पोलिस अधिकारी” बनावट कागद पत्रासह, पोलिसांच्या जाळ्यात !

  • पोलिस दलात नौकरी लाऊन देण्याचे नावाखाली फसवणूक करणारा आरोपी गजाआड 

सडक अर्जुनी, दि. 26 ऑगस्ट : डूग्गीपार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा – खोडशिवनी रेल्वे स्टेशन परीसरात एक वेक्ति हा औरंगाबांद पोलीस दलात पोलीस शिपाई या पदाकरीता नोकरी लावुन देण्याकरीता उमेदवारांकडुन पैसे घेवुन त्यांना नियुक्तीपत्र देणार आहे.

अशी खात्रिशिर माहिती दि. 23 ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्याने वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे फिर्यादी वामनकुमार व्यंकटराव भुरे रा. पालेवाडा यांचे मदतीने पोलीस निरीक्षक मंगेश काळे पो. ठाणे डूग्गीपार यांचे नेतृत्वातील पोलीस पथक खोडशिवनी रेल्वे स्टेशन येथे पाठविण्यात आले. नोकरीचे आमीष देवुन फसवणुक करणारा गुन्हेगार आरोपी ईसम नामे- विलास नारायण गणवीर वय 65 वर्षे रा. किन्ही/मोखे, ता. साकोली, जिल्हा- भंडारा हा संशयीत रित्या कागदपत्रासह आढळुन आल्याने आरोपीस डूग्गीपार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

त्याचे कडे असलेल्या बॅगमध्ये पोलीस अधीकारी चे वर्दी, बनावट नेमप्लेट, पोलीस अधीकाऱ्याचे बनावट ओळखपत्र, औरंगाबाद पोलीस भरती उमेदवार प्रवेशपत्र, मुख्य वैद्यकीय अधीकारी, औरगांबाद, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद यांचे शिक्का असलेले कागदपत्रे, विद्यार्थ्याचे शालेय मुळ कागदपत्रे टि.सी. मार्कशिट, डोमेशीयल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैद्यता प्रमाणपत्र ईत्यादी बॅगचे झडतीत मिळुन आले. आरोपीविरुध्द अशाप्रकारचे भंडारा, गोंदिया, चंद्रपुर जिल्हयात विवीध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती गोंदिया पोलिसांनी दिली आहे.

फिर्यादी वामनकुमार व्यंकटराव भुरे रा. पालेवाडा यांचे तक्रारीवरुन आरोपी नामे विलास नारायण गणवीर रा. किन्ही/मोखे यांचे विरुध्द पोलीस ठाणे डुग्गीपार येथे अपराध क्रमांक – 277/2024 कलम- 204, 205, 319 (2), 318 (4), 62, 336 (3) भा.न्या.स- 2023 अन्वये दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोहवा. दिपक खोटेले करीत आहेत. मा. प्रथमश्रेणी न्यायालय, सडक अर्जुनी यांनी आरोपीस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. सदरचे कारवाईमुळे पोलीस ठाणे डुग्गीपार हद्दीत अशाप्रकारे भविष्यात घडुन येणाऱ्या गुन्हयावर वेळीच आळा घालण्यास डुग्गीपार पोलीसांना मोठे यश आले आहे.

कारवाईमुळे नोकरी लावुन देण्याचे नावाखाली फसवणुकी संबधीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नोकरी लावुन देण्याचे आमीष देऊन पैसे घेवुन भुलथापा देण्याऱ्या ईसमावर लोकांनी विश्वास ठेवु नये. लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. नोकरी लावुन देण्याकरीता कोणी पैश्याची मागणी केल्यास, वा पैश्याची मागणी करणाऱ्या विरुध्द तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तरी जिल्ह्यांतील जनतेस, लोकांनी जागृत होण्याचे गोदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधीकारी, देवरी विवेक पाटील, यांचे मार्गदर्शनात पो.नि. मंगेश काळे, स.पो.नि. प्रमोद बांबोळे, पोहवा दिपक खोटेले, पोहवा घनश्याम उईके, पोना. महेंद्र चौधरी, पोना. घनश्याम मुळे यांनी केलेली आहे.

Leave a Comment

और पढ़ें