शेरू भाई पठाण यांनी 76 विद्यार्थ्यांना गणवेश चे केले वाटप.

सडक अर्जुनी, दिनांक : 14 ऑगस्ट 2024 : तालुक्यातील ग्राम सावंगी येथील माजी सरपंच गुलशेर खा: ( शेरू भाई ) पठाण यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी गावातील अंगणवाडी येथील मुलांना व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना असे एकूण 76 मुला मुलींना आपल्या स्व : खर्चातून शालेय गणवेश चे वाटप केले आहे. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित सरपंच अनुरता बनसोड, ग्राम पंचायत सावंगी येथील सर्व सदस्य, तलाठी हर्षकुमार उईके, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक ब्राह्मणकर, सोबतच गावकरी उपस्थित होते.

दरम्यान बोलताना शेरूभाई पठाण यांनी सांगितले की सदर कार्यक्रम हा कुठलाही राजकीय प्रसिद्धीसाठी नसून गावातील जिल्हा परिषद ची शाळा टिकवण्यासाठी व मुलांना शिक्षणाची गोळी निर्माण व्हावी तसेच येणारा 15 ऑगस्ट हा दिवस उत्साहात साजरा व्हावा हाच एक शुद्ध हेतू आहे. शाळेतील मुख्याध्यापक यांनी, शाळेतील अनेक समस्या बाबत उपस्थित मान्यवरांना माहिती दिली तसेच शिक्षीका लता सोनवाणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

शेरू भाई पठान हे सावंगी गावासाठी वरदान ठरले आहेत, ते गेली अनेक वर्षे पासून सावंगी गावाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील असून त्यांनी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असे अनेक पद जनतेच्या आशीर्वादाने भुसवले असून ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

तसेच गावातील अनेक समस्या बाबत नागरिक आजही त्यांच्याकडून सल्ले घेत असतात, गावातील सामान्य नागरिकांचे, गोरगरिबांचे कामे करण्यासाठी शेरू पठाण नेहमीच तत्पर असतात.

आणि त्याचीच पावती म्हणून गावातील नागरिक त्यांच्या समर्थनातील पक्षातील पदाधिकाऱ्यांना भरघोस मतांनी निवडून देतात, एकांदी पंचवार्षिक सोडली तर नेहमीच त्यांच्या समर्थनातील पदाधिकारी ग्रामपंचायत वर पद भूषवतात, आणि त्यामुळेच शेरू पठाण यांची गावांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

Leave a Comment

और पढ़ें