अर्जुनी मोर, दि. 02 ऑगस्ट : गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोर. तालुक्यातील खामखुरा या गावी गॅस हंड्याच्या स्फोटामुळे माधव काशीराम नेवारे यांचे घर जळुन राख झाल्याची घटना घडली. इंडियन गॅस एजन्सी कडून गॅस हंडा घेतल्यानंतर चहा बनवण्यासाठी गॅसचा वापर करताना अचानक स्फोट झाला. संपूर्ण घर जळुन खाक झाले तर आलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडली.
या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र घरात असलेले कडधान्य जीवनाशक वस्तू , पैसा, जळुन नष्ट झाल्यामुळे माधव निवारे यांच्या कुटुंबीयावर उपास मारीची वेळ आली. संकटाच्या वेळी शासनाकडुन तात्काळ मदत मिळाली नाही. माहिती कळताच अजय लांजेवार यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली व जीवनावश्यक वस्तू स्वरूपात त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. याप्रसंगी गावातील नागरिक, अरविंद मिसार, शंकर मेंढे, दिवाकर चुटे, प्रदीप सहारे, किशोर सहारे, उपस्थित होते.