श्री कृष्ण अवधूत आदीवासी आश्रम शाळेत डी.एड. कॉलेज कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ?


  • आदिवासी विद्यार्थी सुरक्षित आहेत काय ?
  • पालकांना पडला प्रशन, जबाबदार कोण ?
  • शाळेच्या संस्था चालकाने कुणाची परवानगी घेऊन आदिवासी आश्रम शाळेच्या आवारात डी एड कॉलेज आणि महाविद्यालय उघडला. 

गोंदिया, दी. २१ डिसेंबर : देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलय अंतर्गत सुरु असलेल्या गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील श्री कृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेतील वरच्या मजल्यावर डी एड कॉलेज आणि महाविद्यालय सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच संदर्भात देवरी प्रकल्प अधिकरी विकास राचेलवार याना पत्रकारांनी विचारणा केली असता. मला आताच या संदर्भात माहिती मिळाली असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी माध्यमांना सांगितले त्यामुळे पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जिल्यात आदीवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत काय असा प्रशन निर्माण झाला आहे.

तर दोन महिन्या आधी याच शाळेतील मुख्यध्यापकाने १० व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला आपल्या आफिस मध्ये बोलावून अश्लील चाळे केले असता याच शाळेत शिकरणाऱ्या एका मुलाने याचे फोटोग्राप काढून सोशल मीडियावर वायरल केले होते. घडलेल्या प्रकारा बद्दल याच शाळेत शिकणाऱ्या इतर मुला मुलींनी याची लेखी तक्रार प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या कडे केली असता. प्रकल्प अधिकऱ्यानी देवरी प्रकल्प कार्यालयातील  तीन महिला अधिकर्यांनची एक चौकशी समिती गठीत करून चौकशी केली असता. या समितीने शाळेत जाऊन चौकशी केली असता असा कुठलाही प्रकार या शाळेत घडला नसल्याचा अहवाल प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला होता. मात्र प्रसार माध्यमाने सोशल मीडियावर वायरल झालेल्या फोटोवरून बातमी प्रकशित करताच देवरी प्रकल्प अधिकऱ्यानी पुन्हा एकदा महिला कर्मचाऱ्यांनची एम समिती गठीत करून चौकशी केली असता. शाळेतील मुख्याध्यापकाणे पीडित मुलीला या संदर्भात वाच्यता केल्यास १० व्या वर्गाच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली असल्याची माहिती तपासात समोर येताच. पीडित मुलीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असता आरोपी मुख्यपकाला पोलिसांनी अटक करीत गुन्हा दाखल केला.

मात्र चुकीचा अहवाल देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर प्रकल्प अधिकाऱ्याने कुठलीही कार्यवाही केली नाही.  या संदर्भात विचारणा केली असता महिलांच्या अहवालाची चौकशी करण्याची माहिती अपर आयुक्त कार्यलया कडे केली असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.  तर आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्वक शिक्षण देता यावे म्हणून आदीवासी विकास विभगातर्फे निवासी आश्रम शाळा तयार करण्यात आल्या आहेत.  या शाळांची संपूर्ण जवाबदारी सहायक प्रकल्प अधिकर्यांन कडे असते. महिन्यातून एकदा शाळेत जाऊन विद्यर्थ्यांची शैक्षणिक अहवाल, विद्यार्थ्यांना शाळेत पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बरोबर आहेत कि नाही. हे तपासणे याची जवाबदारी सहायक प्रकल्प अधिकर्यांना देण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिली . मात्र सहायक प्रकल्प अधिकारी विजेंद्र मेश्राम यांनी आपली जीम्मेदारी पार पाडली काय असा प्रशन या निमित्ताने उपस्थित होत आहे.

तर या शाळेच्या संस्था चालकाने कुणाची परवानगी घेऊन आदिवासी आश्रम शाळेच्या आवारात डी एड कॉलेज आणि महाविद्यालय उघडला आणि खरच याची माहिती प्रकल्प अधिकरी विकास राचेलवार याना नाही काय ? तर दुसरीकडे आश्रम शाळेची जवाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजेंद्र मेश्राम यांच्या कडे असताना ते खरच शाळेत जाऊन पाहणी करीत होते काय ? आणि शाळेत गेल्यावर त्यांना डी एड कॉलेज या ठिकाणी सुरु आहे हे निदर्शनास आले नाही काय ? असा प्रशन या निमित्ताने उपस्थित होतो. तर या शाळेत खरच डी एड कॉलेज आणि महाविद्यालय सुरु असेल तर तेथील विद्यार्थ्यांन मुळे आणि कर्मचाऱ्यान मुळे आश्रम शाळेतील मुला मुलींना पुढे धोका होऊ शकतो असे स्वतः प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार मध्यमांशी बोलताना म्हणाले.


 

Leave a Comment

और पढ़ें