आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलक आणि लोधी, बिंजवार/इंजवार समाज यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत मांडले मुद्दे


  • शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आणि 24 तास पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर लक्ष केले केंद्रित.

प्रतिनिधी/ गोंदिया, २१ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची भरती न करणे, शिक्षक अधिकारी पदांची भरती, केंद्रप्रमुखांची नियुक्ती न केल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याबाबत शासनाला अवगत केले. अनेक संघटना विविध प्रश्नांवर विधानभवना वर मोर्चा घेऊन आल्या आहेत. जिल्हास्तरावरही अनेक आंदोलने व उपोषण सुरू असून, त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक, एनएचएममध्ये कार्यरत कर्मचारी, समग्र शिक्षा विभागाचे काम करणारे कर्मचारी, पोलीस पाटील, कोतवाल, होमगार्ड, या सर्वांच्या काही रास्त मागण्या आहेत ज्या पूर्ण शासनाने केल्या पाहीजे. अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापन आणि 24 तास पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांना शासनाने प्रथम प्राधान्य द्यावे – आमदार विनोद अग्रवाल

मराठा आरक्षणाच्या चर्चेसोबतच आजही अनेक समाज आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. गोवारी, इंजवार/बिंजवार समाजाचा आदिवासी म्हणून समावेश करावा, लोधी समाज महाराष्ट्रात ओबीसीमध्ये येतो पण केंद्रात नाही, त्यांचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश करावा तसेच गोंदिया शहराचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची 24 तास उपलब्धता व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला असून, तो लवकर मंजूर करण्यात यावा, अशी मागणी गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें