प्रतिनिधी/गोंदिया, दी. 12 डिसेंबर : जनता की पार्टी चाबी संघटनेत सातत्याने प्रवेश सुरू असून आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसेवा केंद्रात भाद्याटोला ( बिरसोला ) गावचे माजी सरपंच राजेश देवधारी व सोबत राधेलाल देवधारी, गणपत देवधारी, काशरत देवधारी, माधोलाल नागफासे, फुलचंद देवधारी, राजकुमार पाचे तसेच मुरपार गावच्या उपसरपंच ममता संजय लिल्हारे, संजय लिल्हारे, बबलू मस्करे यांनी जनता पार्टीच्या चाबी संघटनेत प्रवेश घेऊन जनसेवेचा संकल्प घेतला.
आमदार विनोद अग्रवाल यांनी गळ्यात दुपट्टा टाकून सर्वांचे स्वागत केले. दरम्यान, जनता पार्टी चाबी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष छत्रपाल तुरकर, प्रदेश चिटणीस मुनेश रहांगडाले, रमेश नागफसे, माधव नागफासे, ग्रामपंचायत सदस्य कैलास दाऊदसरे, पुष्पाबाई मेश्राम, करत देवधारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 51