अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पुनर्वसित गावांतील भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावी : जि. प. उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर यांची मागणी


अर्जुनी मोर. दी. 12 डिसेंबर : आमदार जनसंपर्क कार्यालय कोहमारा येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. प्रसंगी गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि.  यशवंत गणविर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पुनर्वसित गावांतील भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

अर्जुनी मोरगाव तालुक्याचा बहुतांश भाग हा अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रात व घनदाट जंगल, डोंगराळ भागात वसलेला असुन, या तालुक्यातील ईटियाडोह धरणाचे सन १९६४ मधे लोकार्पण झाले.  या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या गावातील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.  परंतु आजतागायत त्या पुनर्वसित गावांतील जनता भौतिक सुविधांपासून वंचित आहेत.

त्यांना त्यांच्या गावात भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य सुधाताई रहांगडाले, लोकपाल गहाणे, अविनाश काशीवार तथा शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें