माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा दिवाळी स्नेह मिलन समारोह संपन्न.


अर्जुनी मोरगाव, दी. २८ नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात दीपावली स्नेह मिलन समारोह कार्यक्रम इटियाडोह धरण, गोठणगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपचे प्रदेश नेते माजी आमदार हेमंतभाऊ पटले, जिल्हा परिषद गटनेते लायकराम भेंडारकर,चामेश्वर गहाणे, सभापती मनोज बोपचे, गौरेश बावनकर, होमराज पुस्तोडे, उमाकांत ढेंगे, काशीफजमा कुरेशी, डॉ लक्ष्मण भगत, अर्जुनी-मोर तालुकाध्यक्ष विजय कापगते, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, गोरेगाव तालुकाध्यक्ष संजय बारेवारसह अन्य मान्यवर उपस्थित होते.  तसेच लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्ष आणि सर्व अंगीकृत आघाडी चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें