अवैध गौण खनिज; रेती चोरी प्रकरणी 2 इसमांविरुद्ध गुन्ह्याची नोंद.


 20 लाख 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, पो. स्टे. गंगाझरी पोलिसांची कारवाई.


गोंदिया, दी. १७ ऑक्टोबर : पो.स्टे. गंगाझरी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दिनांक 16/10/2023 रोजी नवरात्र उत्सव निमित्ताने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी 17.10 वा. चे सुमारास मौजा बोरा ते डब्बेटोला रोडवर, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या इसमास टिप्पर क्रमांक एमएच 40 सीडी 0562 सह पकडले.

सदर प्रकरणी पो. ठाणे गंगाझरी येथे ट्रॅक्टर चालक नामे 1) साहिल नवाज अली सय्यद, वय 23 वर्षे, रा. काचेवाणी, ता. तिरोडा, जि. गोंदिया व मालक नामे सौरभ होमेंद्रसिंग चौव्हाण, वय 35 वर्ष, रा. ता. तिरोडा, जि. गोंदिया यांचेविरुद्ध पो. ठाणे गंगाझरी येथे अपराध. क्र. 418/2023 कलम 379, 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून वरील नमूद आरोपी याचे ताब्यातून 1) एक टिप्पर क्र. एमएच 40 सीडी 0562 किंमत 20 लाख रु. व त्यामध्ये रेती 05 ब्रास रेती किंमत 25 हजार रु. एकूण किंमत 20 लाख, 25 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे दिनांक 06/10/2023 रोजी वर नमूद टिप्पर व नमूद दोन्ही आरोपींवर पोलीस स्टेशन तिरोडा येथे रेती चोरीचा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पो.नि. महेश बनसोडे, पोउपनि पराग उल्लेवार यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गंगाझरी येथील सुनील अंबुले, पोहवा सुभाष हिवरे, चापोहवा तुळशीदास पारधी, पोना महेंद्र कटरे, पोशि प्रशांत गौतम यांनी केली.


 

Leave a Comment

और पढ़ें