गोंदिया जिल्ह्यात पाच महिन्यात आढळले तब्बल २० हजार मानसिक रोगी


  • शासकीय आरोग्य संस्थेतील आकडेवारी…

गोंदिया, दि. ०६ ऑक्टोबर : झोप येत नाही, निराश वाटते, मानसिकग्रस्त, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना आत्महत्या हाच एकमेव मार्ग दिसत असतो. तणावात असलेले ते परिस्थितीशी लढण्याचे धाडस सोडून आत्महत्येचा मार्ग पत्करीत असतात. कोविडकाळात मानसिक आरोग्य बिघडून गेले होते. अनेक जण कोविडच्या भीतीमुळे मनातून खचून गेले होते. मानसिक तणावात राहता हजारो लोक मनोरुग्ण होऊ लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात अवघ्या पाच महिन्यांत तब्बल २० हजार २८१ लोकांना मानसिक आजार असल्याचा खळबळजनक आकडा पुढे आला आहे.



गोंदिया जिल्ह्यात आर्गेनिक मेंटल डिसिज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, स्मृतिभ्रंश, भीती वाटणे, दूधवीय आजार, स्किझोफ्रेनिया, उदासीनता, व्यसनाधीनता, अकस्मार (मिरगी), गतिमंद, निद्रानाश व इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सन २०२३ मधील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची परिस्थिती पाहता तब्बल २० हजार २८१ जण मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनापासून ही आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. याहूनही अधिक मानसिक रुग्ण असून, या रुग्णांच्या चार पट मानसिक रोगी जिल्ह्यात असल्याचे समजते. पाच महिन्यांतील मानसिक रोगी असल्याची आकडेवारी ही २० हजारांवर असून ही फक्त शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे.

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजने २०६१ रुग्णांवर उपचार केले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाने ४६५ रुग्णांवर, मेडिकल कॉलेजच्या आयपीडीमध्ये ३२६, रुग्ण, तर जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १७ हजार ४२९ जणांवर मानसिक आजार असल्याचा उपचार सुरू आहे. अवघ्या पाच महिन्यांत २० हजार २८१ जणांना मानसिक आजार असल्याचे समोर आले आहे. डॉ. कुसुमाकर घोरपडे (वैद्यकीय अधिष्ठाता) व डॉ. स्नेहा शर्मा (मानसोपचार तज्ञ) यांनी देखील यावर बोलताना माहिती दिली की ओपीडी मध्ये सर्व प्रकारचे रुग्ण येतात, मात्र आता कोरोना नंतर मनोरुरुग्णांची संख्या वाढली आहे. तर मानसोपचार तज्ञांकडून  तपासणी मध्ये रुग्णाची संख्या वाढली आहे. २०२२ मध्ये महिन्याला ४०० ते ४५० रुग्ण तपासणी करन्यासाठी येत होते, आता २०२३ ला ओपिडी मध्ये ५५० ते ६०० रुग्ण तपासणी करिता येतात. यावरून रुग्णांची संख्या वाढली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें