सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०१ सप्टेम्बर २०२२ : तालुक्यातील ग्राम चिचटोला व लेंडेझरी येथे आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांचे स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्ता बांधकामांचे भूमिपूजन आज १ सप्टेंबर रोजी करण्यात आले. पांढरी जि.प. अतर्गत कोसमतोंडी पं.स. क्षेत्रातील चिचटोला व लेंडेझरी येथील सिमेंट रस्ता बांधकामांचे भूमिपूजन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांचे हस्ते करण्यात आले.
या सिमेंट रस्ता बांधकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जि. प. सदस्या सुधा राहांगडाले, पं. स. सदस्या निशा गिरीधर काशिवार, कृउबा सभापती डॉ. अविनाश काशिवार, माजी जि. प. सदस्य रमेश चु-हे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष डि. यू. राहांगडाले, चिचटोलाचे सरपंच सचिन येसनसुरे, उपसरपंच अनिता बांबोडे, मुरपारचे सरपंच कुंदाताई काशिवार, उपसरपंच सुधाकर पंधरे, मुनिश्वर कापगते, डॉ. दिलीप कापगते, सदाशिव कापगते, टिकाराम गहाणे व सर्व ग्रा.प. सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.