- शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांची 119 वी जयंती निमित्त अनेकांचा सत्कार संपन्न.
गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 09 फेब्रुवारी : महाराष्ट्र केसरी न्युज : राज्यसभा सांसद प्रफूल पटेल यांचे वडील, शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांची 119 वी जयंती निमित्त कार्यक्रमा चे आयोजन गोंदिया येथील डिबी सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात आज दि. 09 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते, जयंती निमित्त, गोंदिया व भंडारा जिह्यातील 14 गुणवंत विद्यार्थी, पत्रकारांसह अनेकांचा सत्कार समारंभचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सांसद प्रफुले पटेल मंचावरून बोलताना म्हणाले, मनोहर भाई पटेल शीक्षित नही थे, दुसरी – तिसरी क्लास के उपर उन्हे शिक्षण नही मिला था, और ईसी लिये मेहनत मजदूरी करते करते वो गुजरात से जबलपूर होते हुये गोंदिया आये, ट्रक के लोडींग अन लोडींग के काम की सुरुवात की, एक सायकल सेल्समेन के तौर पर गाव गाव जाकार काम किया.
समोर बोलताना सांसद पटेल म्हणाले, उन्होने बिडीका वेवसाय सुरु किया, कीव की यें इलाका बिडी बनाने के लिये मशूर था, यहांसे बिडी का उधोग उन्होने सुरु किया, हजारो लोगोंको रोजगार देणेका उन्होणे काम किया, हमारे जिल्हेमे करीब 30 – 35 हजार लोगोंको रोजगार ऊस जमाने मे मिलता था, अब जमाना बदल गया वेवसाय की रूप रेखा बदल गयी लेकिन जिस जमानेमे उन्होने यहांसे सुरुवात की, और उन्होने जब अपने जीवन मे आर्थिक प्रगती की, तों उन्होने सोचा की यें हमारा कर्तव्य बनता है की मे शीक्षित नही, लेकिन बच्च्योंको मैने क्षिक्षा देणी चाहिये.
लोगोको आगे के भविष्य मे बढाने का काम मैने करणा चाहिये, और उश जमानेमे नागपूर के पहिले कोई हायस्कुल नही था, पूरे दो डिस्ट्रिक्ट मे हायस्कुल और कॉलेज नही थे, खाली भंडारा मे एक लाल बहादूर शास्त्री के नाम से विधालय था, उशी टाईम उन्होने एक ही दिन मे 22 हायस्कुल और एक कॉलेज की सुरुवात की, और 22 हायस्कुल बनाकर उन्होने जिल्हा परिषद को दान दे दिया, यें बात सांसद प्रफुले पटेल ने बडे ही गर्व से कही.
यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खा. प्रफुल पटेल, उद्योगपती मोहित गुजराल, हरी शंकर भारतिया यांच्या सह गोंदिया जिल्यातील आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, राजू कारेमोरे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या शह गोंदिया जिल्यातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.
स्मृती दीना निमित्त दरवर्षी, गोंदिया भंडारा जिल्यातिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असून, या वर्षी गोंदिया भंडारा जिल्यातील 14 गुणवंत विद्यार्थी, तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा तसेच इलेट्रॉनिक मीडिया क्षेत्रात काम करणारे वरिष्ठ पत्रकार सतीश पारधी, वेब पोर्टल लोकहित चे अभिजित घोरमारे, प्रिंट मीडिया क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे देशोन्नती वृत्त पत्राचे जिल्हा प्रतिनिधी हिदायत शेख, दैनिक भंडारा पत्रिकांचे संपादक राकेश चेटूले यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांना खा. प्रफुल पटेल यांनी स्व. मनोहर भाई पटेल यांच्या कार्याची आठवून करून दिली. तर या कार्यक्रमाला आलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील स्व. मनोहर भाई पटेल यांनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रशंसा केली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांनी दीप प्रजलन केल्या नंतर पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)