देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण

गोंदिया, दि. 08 फेब्रुवारी : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे लोकार्पण दिल्ली येथील सर्वोच्च न्यायमूर्ती भुषण गवई, मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे. न्यायमूर्ती नितीन सांबरे व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया राजेश जोशी यांच्या हस्ते आज दि.08 फेब्रुवारी रोजी पार पडले आहे.

देवरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षल ग्रस्थ तालुका म्हणून ओडखला जातं असून या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय तयार करण्यात यावा अशी मागणी तालुका बार असोसिएशन चे अध्यक्ष एड प्रशांत सांगडीवर यांनी सर्वोच्च न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या कडे केले आहे.

तर भविष्यात नक्कीच विचार केला जाईल अशी गव्ही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजित कार्यक्रमात दिली आहे. तर न्यायमूर्ती भुषण गवई हे मुंबई न्यायल्यात न्यायमूर्ती असताना त्यांनी देवरी न्यायाल्याच्या नवीन इमारतीला मंजुरी दिली होती, त्यामुळे माझ्याच हस्ते या इमारतीचे लोकार्पण झाल्याने या इमारतीतून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळेल अशी इच्छा न्यायमूर्ती भुषण गवई यांनी केली आहे.

या लोकार्पण सोहळ्यात तालुका बार असोसिएशन च्या वतीने वकिलांचा देखील सत्कार करण्यात आला देवरी आमगाव विधसनभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या सह अनेक लोकप्रतिनिधी तसेच देवरी तालुक्यातील लोकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठी हजेरी लावली होती.

 

Leave a Comment

और पढ़ें