सौन्दड; मामा तलावाच्या वेस्ट वेअर मधून अवैधरित्या मुरूम उत्खणन, साहेब आता सांगा आशीर्वाद कुणाचे ?

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 06 फेब्रुवारी : तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील मामा तलावाच्या वेस्ट वेअर मधून मुरुमाचे जेशिबी च्या साहाय्याने अवैधरित्या उत्खणन करून वाहतूक केली जात आहे, त्या मुळे या अवैधरित्या उत्खणनाला जबाबदार कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे, हेच नही तर सौन्दड परिसरातील, वन विभाग व महसूल विभाग मधे येत असलेल्या शेत शिवरातून देखील मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खणान केले जाते, रोज होत असलेल्या अवैधरित्या मुरूम उत्खणना मुळे महसूल विभागाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे, गाव रस्त्यांचे तीन तेरा वाजत आहेत, ठेकेदार आणि कथित अधिकारी माला माल होत आहेत, अनेकदा बातम्या प्रकाशित करून देखील कारवाया थास्तुर मातुर होत आहेत, त्या मुळे साहेब आता तुमीच सांगा नक्की आशीर्वाद कुणाचे आहे ?

  • तालुक्यातील महसूल यंत्रणा कुचकामी

सडक अर्जुनी तालुक्यातील महसूल यंत्रणा कुचकामी असल्याचे अनेक उदाहरणे आहेत, तालुक्यात भर दिवसा अवैधरित्या मुरूम जेसीबी च्या माध्यमातून उत्खणन करून वाहतूक केले जाते, तक्रारी करिता तहसीलदारांना भ्रमण ध्वणी वरून संपर्क केल्यास ते प्रतिसाद देत नही, वारंवार प्रसार माध्यमे वृत्त प्रकाशित करून देखील महसूल यंत्रणा सक्रिय नही, त्या मुळे साहेब या लोकांवर आशीर्वाद कुणाचे?

  • महसूल विभाग प्रेस नोट देत नाही.

काहीवेळा एखादया वाहणावर महसूल विभागाने जप्तीची कारवाई केली तर त्या कारवाईची माहिती तालुक्यातील पत्रकारांना प्रेस नोट च्या माध्यमातून दिली गेली पाहिजे मात्र तसे होत नही, त्या मुळे कुठे व कधी कारवाई, महसूल विभागाने केली याची खात्री होत नही, याला कारण काय ? महसूल विभागाचे आणि माफियाचे जवळीक संबंध अशल्याने ते संबंध जोपासले जाते, म्हणून माहिती दिली जात नाही, एखांदा पत्रकार झालेल्या कारवाई ची माहिती मागण्यासाठी कार्यालयात गेल्यास महसूल विभागाचे अधिकारी म्हणतात आदी पत्र लावा तर माहिती देऊ, त्या मुळे कुणीही झालेल्या कारवाईचे वृत्त प्रकाशित करण्यास इच्छुक नाही, याला जबाबर महसूल विभागच असते, काही वेळा तर पकडलेले वाहन कारवाई न करता सोडून दिले जातात, अशी ही पंच क्रोशीत चर्चा आहे, सावधान आज कारवाई होणार आहे, सूत्रांच्या माहिती नुसार – असेही मेसेज आदीच पाठवले जातात, त्या मुळे मोठे वाहन धारक पसार होतात, आणि घटना स्थळी गेलेले अधिकारी सांगतात येते कुणीच नही, मग चोरी झाली कशी, साहेब तुम्हीच सांगा आशीर्वाद कुणाचे?

  • तलाठी, मंडळ अधिकारी, गावात राहत नाही.

तालुक्यात होत असलेल्या अवैध महसूल चोरीला स्वतः महसूल विभाग जबाबदार आहे, याला कारणार म्हणजे गाव पातळीवर राहणारी महसूल यंत्रणा आहे, गावात तलाठी, मंडळ अधिकारी, राहत नाहीत मात्र शासना कडून मिळणारा घर भाडे भत्ता घेतात, आणि तालुक्याच्या ठिकाणी राहतात, त्या मुळे शनिवारी आणि रविवारी भर दिवसा मुरमाचे अवैध उत्खनन केले जाते, अधिकारी तर सोडाच साहेब तुमचा तलाठी देखील फोन उचलत नही, या तलाठी दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांवर महसूल विभागाचे वचक नही, आता तुमीच सांगा साहेब आशीर्वाद कुणाचे?

  • भंडारा जिल्ह्यातील मुरूम येतो गोंदिया जिल्ह्यात.

50 ब्रास मुरूम ची रॉयल्टी घेऊन 500 ब्रास मुरूम उत्तखनण केले जाते, भंडारा जिल्ह्यातील मुरूम गोंदिया जिल्ह्यात येते एक रॉयल्टी घेऊन टोकनवर कारभार दिवसभर चालते, रात्री सोडा साहेब भर दिवसा कारभार चालते, या वाहणाची कुणीच करीत नही तपासणी, बंद खदाणीतून उत्खणन जोमात आणि महसूल विभाग कोमात, आता तुम्हीच सांगा साहेब आशीर्वाद कुणाचे ?

 

Leave a Comment

और पढ़ें