- हेल्मेट वितरण करत हेल्मेट चे महत्व पटवून देत 36 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे समापन संपन्न.
- कॉलेजतील विद्यार्थी तसेच, नियम पाळणाऱ्यांना ऑटो चालकांना प्रमाणपत्र देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गोंदिया, दि. 23 जानेवारी : 36 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन गोंदियात दि. 22 जानेवारी रोजी करण्यात आले होते, गोंदियात बाईक रॅली, सायकल रॅली, त्याचप्रमाणे वाकेथॉन करून वॉक ऑन राईट वे अशी जनजागृती करून वाहन चालवताना वाहन चालकांनी कोण कोणत्या नियमाचे पालन करणे फार गरजेचे आहे, सुरक्षेच्या उपाययोजना, त्याचबरोबर हेल्मेट वापरण्याचे महत्व समजावून देत, गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात हेल्मेट चे वितरण करण्यात आले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने उपप्रादेशिक परिवहन विभागातल्या लोकांच्या वाहतूक सुरक्षे संबंधी जनजागृती करता पटनाट्य पासून विविध उपक्रम राबविताना सर्वसामान्य लोकांना वाहतुकीचे नियम सुद्धा कळावे याकरता सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात आले. आणि या कार्यक्रमाचे समापन निमित्त हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे असे पटवून देताना, हेल्मेट संबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हेल्मेटचे वितरण उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आले.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते कॉलेजचे विद्यार्थी, आणि गरजू नागरिकांना हेल्मेटचे वितरण केले गेले. त्याचबरोबर नियमाचे पालन करून आजवर कधीही नियमाचे उल्लंघन न करणारे असे ऑटो चालकांचा सुद्धा सन्मान करत त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले, यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.