अवैध सागवान वृक्षांची कत्तल करणारे चार आरोपी वन विभागाच्या ताब्यात!

सडक अर्जुनी, दि. 16 ऑगस्ट : सडक अर्जुनी तालुक्यात अवैध रित्या सागवान वृक्षांच्या कत्तलीचे सत्र सुरूच आहे, काही दिवसा अगोदर वन विभागाने कारवाई करीत सागवान वृक्षांच्या पाट्या मोठ्या प्रमाणात जप्त केल्या होत्या तर आज पुन्हा वन विभागाने कारवाई करीत आपली उपस्थिती दर्ज केली आहे की वन विभाग जागे आहे. चोरी केल्यास बेड्या ठोकल्या जातील. प्राप्त माहितीनुसार शेंडा वन क्षेत्रातील ग्राम सहाकेपार बीट येथील नराटीटोला/ पुतळी येथील विना परवाना संरक्षित व राखिव वनातुन सागवन वृक्षांची कत्तल करून विक्री करणाऱ्या 4 आरोपींना वन विभागाने आज ( 16 रोजी ) ताब्यात घेऊन वन गुन्हा दाखल केला आहे.

यातील आरोपी प्रकाश धनलाल खंडाते व इतर 3 लोकांना वनातील लाकूड चोरी प्रकरणी आज ताब्यात घेऊन त्यांची विचारणी केली असता यातील लोकांनी 13 ऑगस्ट च्या रात्री राखव वन क्षेत्रातील सागवन वृक्षांची 1 व 14 ऑगस्ट रोजी रात्री 1 अश्या 2 वृक्षांची कत्तल करून त्यांचे 9 नग तयार केले व साकोली तालुक्यातील ग्राम पळसगांव, सोनका येथील शंकर ब्राम्हणकर यांना पंचवीस हजार रुपयात विक्री केल्याची माहिती देत वन अधिकाऱ्यांना कबुली दिली आहे.

तर विक्री केलेल्या सागवन वृक्षांची शासकीय किंमत 1 लाख 6 हजार 963 रुपये ( 2.087 घन मीटर) इतकी आहे. तर लाकूड वाहतुकी करीता वापरण्यात आलेले वाहन क्र. एम.एच. 35 जे. 3296 असे असून कत्तल केलेले सागवान वृक्षांचे लाकुड जप्त केले असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम अन्वय वन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. 

दिनांक : 17 ऑगस्ट रोजी चारही आरोपींना तालुका  न्यायालयात हजर केले जाईल. सदरची कारवाई सडक अर्जुनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक यु.पी. गोटाफोडे, क्षेत्र सहायक एस.ए. घुगे, वनरक्षक डी.डी. माहुरे, टी.पी. चव्हाण, पी.व्ही. कांबळे, टी.एम. बेलकर, पी.एम. पटले, आर.जे. उईके, एम.एफ. सैय्यद, महिला कर्मचारी टी.आर. भेलावे, पी.व्ही. कान्हेकर, भरत बहेकार, समिर बंसोड, विपुल शहारे, किशोर बडवाईक यांच्या पथकाने केली आहे. वन विभागातील एक वृक्षांची कत्तल केल्यास तब्बल 50 हजार रुपयाचा दंड आकारला जाईल अशी तरतूद वन विभाच्या नव्या कायद्यात करण्यात आली आहे. त्या नुसार पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें