सौंदड येथील खराब रस्त्याच्या व बंद पडलेल्या उड्डाण पुलाच्या मागण्या घेऊन “सरकार विरोधात” आंदोलन !

  • गोंदिया जिल्हा व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने ‘जागो सरकार जागो’ आंदोलनाचे आयौजन

सडक अर्जुनी, दि. 2 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते रायपूर या महामार्गावरील ग्राम सौंदड येथे रखडलेल्या उड्डाण पुलाच्या व सर्विस मर्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन धारकांना मार्ग शोधत चालावे लागते, अनेक वेळ याठिकाणी अपघात झाले असून, ट्रॅफिक नेहमी जाम राहते, तर दोन दोन दिवस ट्रॅफिक जाम राहते, परिणामी स्थानिक नागरिकांना व प्रवाश्यांना खूप त्रास सहन करावे लागत आहे.

नागरिकांच्या त्रासाला लक्ष्यात घेता जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्राम सौंदड येथे दि. 3 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ‘जागो सरकार जागो’ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून आंदोलनाचे नेतृत्व आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. करीता नागरिकांनी सौंदड बस स्थानक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें