लोहिया विद्यालयात महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी


सौंदड, दि. २८ नोव्हेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 नोव्हेंबर 2023 रोज मंगळावर ला विद्यालयात संस्थापक- संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने व मधुसूदन अग्रवाल प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, व्ही. एफ. घनमारे सर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी स. शिक्षक व्ही. एफ. घनमारे सर, प्राचार्य चिखलोंढे यांनी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योग दानाबद्दल विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी सुद्धा आपल्या भाषणातून महात्मा फुलेंच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार स. शि. यु. बी.डोये यांनी केले.


 

Leave a Comment

और पढ़ें