- आरोग्य विभागाच्या विरोधात नागरिकांचा रोष!
प्रतिनिधी / सालेकसा, ( राहुल हटवार ) दी. 18 नोव्हेंबर : सालेकसा तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असलेली सालेकसा ग्रामीण रुग्णालय सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे चर्चेत आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी तिरखेडी निवासी मुरारी डोंगरे यांचा रेल्वे रुळावर अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे आणण्यात आल्यावर कोणतेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने जवळपास ४ तास शव रुग्णालयाच्या बाहेर बेवारस स्थितीत पडले असल्याची अमानवीय घटना घडल्याने आरोग्य विभागाच्या विरोधात रोष निर्माण झाला होता.
पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने शवविच्छेदन करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने नागरिकांनी खाजगी रुग्णवाहिकेतून आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या वतीने यासाठी असहकार्य करत असंवेदशीलता दाखवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्या काही संपेना
ग्रामीण रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचारी दिवाळी निमित्त सुटीवर गेले परंतु अद्याप परत आलेच नाही. त्यामुळे आज (१८ नोव्हेंबर) घडलेल्या घटनेनंतर अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने गदारोळ माजला होता. नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त करत तात्काळ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी करत मृतदेह तसेच ठेवावे अशी मागणी केली. परंतु जवळपास ४ तास प्रशासनाच्या माध्यमाने कोणतेही हालचाल न झाल्याने चंदा गोळा करून खाजगी वाहनाने आमगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
नाही तर रुग्णालयाला ताला ठोकणार
येत्या ७ दिवसात पूर्णकालीन डॉक्टरची व्यवस्था न केल्यास रुग्णालयाला ताला लावण्याची भूमिका तालुका काँग्रेस कमिटी सालेकसाचे अध्यक्ष राजू दोनोडे आणि बहुजन समाजवादी पार्टी विधानसभा प्रभारी कैलाश गजभिये यांनी व्यक्त केले आहे.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)