सडक अर्जुनी, दी. 18 नोव्हेंबर : तालुक्यातील ग्राम चिखली येथील युवक गुरूदास दामाजी कांबळे वय वर्ष 32 या तरुणाची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांचा 13/11/2023 ला मृत्यू झाला. घरचा कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली त्यांच्या मागे आई, लहान भाऊ असा परीवार आहे. या कुटुंबीयांची भेट घेऊन हरीष बन्सोड यांनी त्यांच्या परिस्थितीची व्यथा जाणून आर्थिक मदत करून मानवतेचा संदेश दिला आहे.
यांच्या सोबत यावेळी अजय कोटगिरवार, मिलिंद झिंगरे, सुशिल उके, सुधीर शिवणकर, आदी गावकरी उपस्थित होते. या वेळी हरीष बन्सोड यांनी शासनाची मदत मिळवून देण्यास मदत करू असे आश्वासन दिले. बन्सोड हे तालुका काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती सेल चे अध्यक्ष आहेत. तर तालुक्यातील एक युवा उद्योजक आहेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी चे संचालक आहेत.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 55