अर्जुनी मोर., दी. 28 ऑक्टोबर : मुंबई येथील इंदु मील येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी भेट दिली. या स्मारकाचा अंतिम आराखडा सन 2015 मध्ये मंजूर करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना इंदु मील येथील आराखडा अंतिम करण्याची जबाबदारी दिली होती.
माजी मंत्री राजकुमार बडोले सांगतात त्यासाठी त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली होती. सदर आराखडा मी सामाजिक न्याय मंत्री असतांना माझ्या हातुन पुर्ण झाला हे माझे भाग्य समजतो. स्मारकाला भेट देतांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्मारकाचे काम जलदगतीने सुरू असून शापोरजी, पालनजी ही कंपनी हे काम करत आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 400 फूट उंच पुतळा या ठिकाणी तयार होत आहे.
आज या स्मारकाला माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. सोबत अर्जुनी मोर तालुकाध्यक्ष विजय कापगते, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, तसेच उपसभापती शालींदर कापगते, शिशिर येळे सोबत होते. प्रकल्प प्रमुख साळवे यांनी सर्वांचे स्वागत केलं आणि संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. पुतळ्याचे काम सुरु असुन सदर स्मारक 2024 च्या शेवटी पूर्ण होईल असे साळवे म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आणि स्मारकाचा आराखडा आपण पूर्ण केले याचे समाधान होते.