पळसगाव (राका) येथील उपसरपंच सुनील चांदेवार, पदावरून पायउतार

  • घराच्या जागेचे अतिक्रमण प्रकरण भोवले.
  • सरपंचावरही अपात्रतेची टांगती तलवार!!

सडक अर्जुनी, दी. ०६ फेब्रुवारी : तालुक्यातील पळसगाव, राका ग्राम पंचायतचे उपसरपंच सुनील सदाराम चांदेवार हे पळसगाव राका ग्राम पंचायत मध्ये मागील चार वर्षापासून सदस्य असून त्यांचे वडील सदाराम बुधा चांदेवार यांनी मौजा पळसगाव, राका येथील शासकीय गट क्रमांक : 127 मधील आराजी, 1.70 पैकी 0.03 हेक्टर आर जागेवर अतिक्रमण केले. अतिक्रमण केलेल्या जागेत आपल्या वडिलांसोबत एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे यांना ग्राम पंचायत सदस्य पद धारण करण्यासाठी अपात्र ठरवावे म्हणून अर्जदार सुभाष शालिकराम कापगते यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कडे अर्ज दाखल केला होता. प्रकरणाची शहानिशा करून अखेर सुनील सदाराम चांदेवार यांना उपसरपंच पदावरून पाय उतार करण्यात आले आहे.

सविस्तर असे की पळसगाव, राका येथील उपसरपंच सुनील सदाराम चांदेवार यांचे घर हे अतिक्रमण जमिनीवर असल्यामुळे या संदर्भात त्यांना ग्राम पंचायत सदस्य पद धारण करण्यासाठी अपात्र ठरविण्यात यावे आहे. या करिता अर्जदार ग्राम पंचायत सदस्य सुभाष शालिकराम कापगते यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.

त्यानुरूप जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सुनील सदाराम चांदेवार यांना 31/01/2024 ला अपात्र केले. परंतु या निर्णया विरोधात सुनील चांदेवार यांनी माननिय अप्पर आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयात अपील केली होती. त्यामुळे सदर प्रकरणात माननीय अप्पर आयुक्त यांनी दि. 08/07/2024 रोजी फेर सुनावणी साठी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे परत पाठविले.

परंतु फेर सुनावणीत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दि. 27/11/2024 रोजी ग्राम पंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरविले. परंतु पुन्हा सुनील चांदेवार यांनी माननीय अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे अपील केली. परंतु सदर अपील माननीय अप्पर आयुक्त नागपूर यांनी फेटाळली. व ग्राम पंचायतचे उपसरपंच सुनील सदाराम चांदेवार हे दि. 28/01/2025 रोजी अपात्र आहेत असा आदेश पारित केला. त्यामुळे सुनील सदाराम चांदेवार हे उपसरपंच पदावरून पाय उतार झाले. तर सरपंच पदही अडचणीत येण्याची शक्यता अर्जदार यांनी वर्तवली आहे. उल्लेखनीय असे की 2005 पासून या ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच यांनी पाच वर्षापर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही हे विशेष, त्यामुळे सरपंच यांची पुढची वाटचाल कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें