गोंदिया, दी. ०६ फेब्रुवारी : गोंदिया रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून अवैध पिस्तूल, ४ जिवंत काडतुस सह एकाला अटक केली. ही कारवाई ५ फेब्रुवारी रोजी रात्र दरम्यान करण्यात आली. आकाश सुनील साळवे (२९) रा. सार्वजनिक क्वॉर्टर क्रमांक-४०७, शिव मंदिर, न्यू राजेंद्रनगर, मेडिसिन हॉस्पिटलच्या मागे, पोलिस ठाणे राजेंद्रनगर, जि. रायपूर ( छत्तीसगड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही. के. तिवारी यांच्या सूचनेनुसार रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार उत्तम रघुवंशी यांना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३/४ वर एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्यामुळे त्याची चौकशी केली असता तो घाबरला. समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
संशय बळावल्याने त्याला आरपीएफ चौकी गोंदिया येथे आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या जॅकेटमधून एक पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, ३ हजार रुपये, एक पर्स, ड्रायव्हिंग लायसन्स, एक लायट्र व विवो कंपनीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला. गोंदिया रेल्वे पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( आय ) २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार तो सराईत गुन्हेगार आहे.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)