- आरोपी सह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गोंदिया, दी. ०६ फेब्रुवारी : जनावरांची अवेध रित्या तस्करी करणाऱ्या एका बंद कंटेनर चा अपघात झाला, ही घटना कोरची, चिचगड मार्गावरील डासगड घाटावर घडली, अपघातात तब्बल ३५ जनावरे ठार झाली, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुका अंतर्गत येणारे चिचगड पोलीस स्टेशन येथील ग्राम कोरची – चिचगड मार्गावरील डासगड घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, घटणे नंतर ट्रक चालक पसार झाला मात्र चिचगड पोलिसांनी सकाळच्या सुमारास त्याला पकडले.
३५ जनावरे घेऊन जाणारा बंद कंटेनर ( ट्रक ) क्रमांक : एम. एच. ३० बी. डी. १०९५ असे असून कोरची ते चिचगड मार्गाने जात होता. डासगड प्रवेश द्वारा समोरील घाटाच्या वळण रस्त्यावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. अपघातात ट्रक मध्ये असलेली ३५ जनावरे जागीच ठार झाली. ट्रकच्या केबिनमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने ट्रक चालक ही जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला, आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
- ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपी वाहन चालक अब्दुल राजिक अब्दुल खालिक वय वर्षे ३१, रा. पठाणपुरा वॉर्ड मूर्तिजापूर) असे असून छत्तीसगड राज्यातील कडीबाजार जि. बालोद येथून कंटेनरमध्ये जनावरे भरून ती कोरची- देवरी- नागपूरमार्गे मूर्तिजापूर येथे नेत होते, आरोपी विरुध्द कलम ११ (१) (ड) प्रा.नि.वा.का, सहकलम ५ (अ) ,६,९ (अ) महा. पशुसंवर्धन अधिनियम १९७६, सहकलम २८१, १२५ (अ) भान्यासं २०२३ सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे तसेच कंटेनरसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे गोंदिया तालुक्यातील चंगेरा या गावातून पण मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी करून याच चिचगड – ककोडी – कोरची मार्गे हैदराबादला पाठविले जातात. यातील गोवंश तस्कर कधी पोलिसांच्या तावडीत सापडतात तर कधी पळून जातात मध्यरात्रीच्या सुमारास ही तस्करी होत असल्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यात अडचण निर्माण होते.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)