- वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ
पुणे, वृतसेवा, दी. 06 फेब्रुवारी : महावितरणने देखभाल दुरुस्ती खर्च गेल्या दोन वर्षांत आवश्यकतेपेक्षा जवळपास हजार कोटी रुपयांनी कमी केला आहे. हा खर्च २० टक्के असावा, असे निर्देश आयोगाकडून असताना खर्च कमी झाल्याने वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप तज्ज्ञांमधून केला जात आहे. लोकमत ने दिलेल्या माहिती नुसार, आयोगासमोर सादर केलेल्या पुढील पाच वर्षासाठीच्या वीजदर प्रस्तावानुसार २०२२ -२३ मध्ये देखभाल दुरुस्तीसाठी केलेला खर्च केवळ १३.६ टक्केच, तर २०२३-२४ मध्ये देखभाल दुरुस्तीसाठी केलेला खर्च १५.५ टक्के अशल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्यातिल ग्राहकांना अंधारात राहावे लागले आहे, १ लाख ३ हजार वेळा वीज खंडित झाल्याने सात कोटी ६४ लाख ग्राहकांना ५१ हजार ८७५ तास अंधारात राहावे लागले अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
१ लाख ३ हजार वेळा वीज खंडित झाली.
66 महावितरण वीज बिलात ग्राहकांकडून वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पैसे तर घेते, मात्र ते पूर्ण पैसे देखभाल दुरुस्तीसाठी खर्चच करत नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यात तब्बल १ लाख ३ हजार वेळा वीज खंडित झाल्याने सात कोटी ६४ लाख ग्राहकांना ५१ हजार ८७५ तास अंधारात राहावे लागले अशी माहिती विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे यांनी मध्यमांसोबत बोलताना दिली आहे.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)