सडक/अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०२ : सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा दिनांक – 19 जून 2022 ला आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ( NMMS ) परिक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी एकूण 6 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
त्यांपैकी कु.आयुश्री बिरला गणवीर, कु. अलमास असिफ शेख, तुषार जयेंद्र वंजारी या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत रू. 12000/- या वार्षिक दराने चार वर्षात एकूण 48000/- रुपये एवढा शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
दरवर्षी विद्यालयातून शिष्यवृत्तीसाठी निवडीची सलगता या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.
विद्यार्थांच्या मिळविलेल्या या सुयशाबद्दल लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश लोहिया, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका कल्पना काळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई- वडील व शाळेच्या सर्व घटकांना दिले आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अशाप्रकारे विविध स्पर्धा परिक्षेत भाग घेऊन शासनाच्या अनेेक शिष्यवृत्तीसंबंधी योजनांचा लाभ घ्यावा अशी सदिच्छा संस्थापक जगदीश लोहिया यांनी व्यक्त केली आहे.