कॉ. ऑपरेटिव्ह बँकेतील ठेव हिस्से गोंदिया बँकेला गिळंकृत करू देणार नाही : ललित कुमार बाळबुद्धे

  • कर्जदार शेतकर्याचे संस्थांन कडे जमा असलेले ठेव- हिस्से जिल्हा बँक जप्त करणार! 

गोंदिया, दि. 11 फेब्रुवारी : कॉ. ऑपरेटिव्ह बँक तालुका अर्जुनी मोरगाव तसेच जिल्हा बँक यांच्या नीतीने 2022 मध्ये घेतलेल्या आमसभेच्या हवाला देत बँकेने तालुक्यातील प्रत्येक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना बँकेच्या निरीक्षकांनी संस्थांना लिखित पत्र दिलेले आहे. अनिष्ट तफावतीमध्ये कर्जदार शेतकर्याचे संस्थांन कडे जमा असलेले ठेव- हिस्से अनिष्ट तफावतीमध्ये जमा करेल ही एक अयोग्य बाब बँक करू पाहत आहे.

याच्या विरोधात तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये ठरले बँकेने असे केल्यास विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ हा प्रकर्षाने विरोध करेल आणि गरज भासल्यास तालुक्यातील प्रत्येक बँक समोर आंदोलन करण्यात येईल, हा आदेश आणि हा ठराव जोपर्यंत बँक मागे घेत नाही, तोपर्यंत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गप्प बसणार नाही असा इसरा शिष्टमंडळाने दिला आहे. 

बँकेने हा ठराव मागे घ्यावा आणि कर्जदार शेतकऱ्यांचे ठेव हिस्से सुरक्षित ठेवावे अशी भूमिका तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच आदिवासी सेवा सहकारी संस्था यांनी मांडले आहे. जिल्हा बँकेने 2022 मध्ये झालेल्या आमसभेच्या ठरावाची प्रत सार्वजनिक करावी त्या ठराव प्रतिवर बँकेच्या कोणकोणत्या संचालक मंडळाची सही आहे आणि हा ठराव कोण कोणत्या बँक संचालकास मान्य आहे, हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दाखवावे असे मत ललित कुमार बाळबुद्धे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ अर्जुनी मोरगाव यांनी पत्रकारांशी बोलताना वेक्त केले.

Leave a Comment

और पढ़ें