गोंदिया, दि. 11 फेब्रुवारी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मुस्लिम बांधवांचा धार्मिक स्थान ( दर्गा ) आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी लांबून येतात, नागपूर येथील दर्शनासाठी आलेले भाविक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ईटीयाडोह धरणाच्या कालव्यात आंघोळीसाठी गेले असता, यातील एका वृद्ध इसमाचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला.
मृतक हबीब खान जब्बारखा पठाण वय 63 वर्ष ताजबाग नागपूर असे असून त्यांच्यासोबत असलेले, निसार मस्तान अली वय 65 वर्ष, साजिद रशीद खान 45 वर्ष मोठा ताजबाग आझाद कॉलनी नागपूर, अमीर बापू मिया शेख वय 43 वर्ष मोठा ताज बाग जवळ आझाद कॉलनी नागपूर, रेहान मुस्ताक शेख वय 41 वर्ष जिजामाता नगर दिघोरी नागपूर असे असून यातील मृतक पाय घसरून धरणात वाहून गेला.
केशोरी पोलीसांनी त्वरित धरणाचे पाणी बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाला सुचना दिल्या, पाणी बंद केल्यानंतर शोधा सुरू झाले, सायंकाळी 6 वाजता मृतदेह मिळाला, आंघोळीच्या ठिकाणापासून 400 मीटर अंतरावर मृतदेह मिळाले, केशोरी येथील पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात बिट अमलदार प्रेमदास होळी, पोलीस शिपाई मोहन कुहीकर, अजय मौजे तपास करीत आहेत.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)