- पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देश्याने मृतदेह जाळले.
- पोलिसांनी काही तासात आरोपीचा केला शोध.
गोंदिया, दि. 11 फेब्रुवारी : गोरेगाव तालुक्यातील देवुटोला शेत शिवारात अनोळखी मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 07 वाजता आढळून आला, याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचले, आधी मुलीचा पत्ता लावला असता मृतक मुलगी पौर्णिमा विनोद नागवंशी वय वर्षे अंदाजे 18, रा. मानेकसा ( कालिमाटी ) आमगाव तालुक्यांतील असून पोलिसांनी तिचे नातेवाईक आई- वडील यांना सखोल विचारपूस चौकशी केली.
घटनेतील आरोपी मुलीचा ओळखीचा असून शकील मुस्तफा सिद्दीकी वय 38 रा. मामा चौक, गोंदिया याला खुनाच्या गुन्ह्यात दुपारी ताब्यात घेण्यात आले, पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक मुलगी व आरोपीचे जवळीक संबंध वीट भट्टीवर जुळून आल्याने ती त्याच्यापासून गरोधर होती, मुलगी सोबत राहण्याचा तगादा लावत असल्याने तिला शेत शिवारात नेऊन गळफास लावून, तिच्यावर चादर व पाला पाचोळा टाकून ओळख नष्ट करण्याच्या उद्देश्याने जाळले अशी कबुली आरोपींने पोलिसांना दिलेल्या माहितीत दिली, पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद केली असून आरोपी ताब्यात आहे.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)