सौंदड, दि. 07 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा कारण नियमित अभ्यासाने खरे यश प्राप्त होऊन जीवनात उंच भरारी घेता येते तसेच विद्यार्थ्यांनी मनात कोणतेही नैराश्य न आणता दिनचर्या व अभ्यासातील सातत्य कायम ठेवून निर्भयपणे परीक्षेला सामोरे जावे असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य के.के. मेश्राम यांनी केले.
येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सौन्दड येथे आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या निरोप समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक अनिल बोरकर, दिगंबर कापगते, उद्धव हर्षे, स्वादिप रामटेके, प्रीती टेम्भूर्णीकर, प्रतिभा बाकडे, नमिता मांडारकार, अश्विनी डोंगरवार, हीना बोरकर, तेजू मारवाडे, माधुरी राऊत, संदीप निर्वाण, मोहन कोहळे उपस्थित होते.
या प्रसंगी इयत्ता 10 वी तील विद्यार्थी रिया दरवडे, रुद्राक्षी शेलवंटे, मोहिनी ब्राम्हणकर, डॉली राऊत यांनी विद्यालयातील आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे संचालन लोकेश्री मेश्राम, नीरज कवरे, समीर रहेले यांनी केले. तर आभार लक्ष्मी ब्राम्हणकर, नंदिनी खडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता 9 वि तील विद्यार्थी जानवी किरणापुरे, वंशिका डोंगरवार, तमन्ना शहारे, विशाखा फुंडे, वैष्णवी निर्वान, कसक राऊत, अंजली इरले तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)