कोसमतोंडी, धानोरी, पांढरी परिसरात अवैध मुरूम उत्खनन जोमात, महसूल विभागाचे दुर्लक्ष!

सडक अर्जुनी, दी. 07 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम कोसमतोंडी, धानोरी, पांढरी परिसरात अवैध मुरूम उत्खनन जोमात सुरू आहे, तर या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे, या भागात सुरू असलेल्या मार्गाच्या बांधकामावर अनेक ठिकाणी मुरूम टाकण्यात आले आहे, मात्र हे मुरूम अवैध रित्या उत्खनन करून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते रुंदीकरनाचे काम या भागात सुरू आहे, अशात आवश्यक असलेले मुरूम हे वीणा रॉयल्टी चे वापरण्यात येत आहे, त्या मुळे महसूल विभाग ठेकेदारांना चोरी करण्यास मदत करते का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे, या भागात मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याने तसेच ते मुख्य मार्गावर सुरू असलेल्या कामावर टाकण्यात येत असल्याने याची रॉयल्टी आहे का ? अशी माहिती पांढरी येथील तलाठी मधुकर टेंभूर्निकर यांना आम्ही भ्रमण ध्वनी वरून विचारले असता त्या बाबद रॉयल्टी देण्यात आली नाही अशी माहिती दिली आहे.

त्या मुळे या अवैध कारभारावर महसूल विभागाचे हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात आहे, महसूल विभाग ठेकेदारांना खुली छूट देत असल्याचे यावरून लक्ष्यात येते हेच नाही तर या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या मुरूम चे उत्खनन सुरू आहे, त्या मुळे महसूल विभाग काय कारवाई करणार या कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ठेकेदारांना सरक्षण देऊन सामान्य माणसावर महसूल विभाग कारवाई करत असल्याचे चित्र आपण अनेक वेळ पाहिले आहे. त्या मुळे समाज माध्यमातून चर्चे दरम्यान महसूल विभागवार टीका देखील केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें