गोंदिया शहरातील विविध भागांमध्ये बंद असलेली नळ योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी.
गोंदिया, दी. 24 मे : उन्हाळ्याच्या झडा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या असून गोंदिया जिल्ह्यात देखील आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गोंदिया शहरातील अनेक भागातील नगरपरिषदेचे नळ कनेक्शन बंद असल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. या प्रमुख मागणीला घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नगरपरिषदेवर आज 24 मे रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी गोंदिया शहरातील पाण्याच्या मागणीसह विविध समस्यांना घेऊन नगरपरिषदेवर हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घरकुल योजना तसेच गोंदिया शहरातील रोड-रस्ते दुरुस्तीच्या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेने यावेळी दिले. तर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी दिला.