चुलबंद नदीच्या फुटाळा रेती घाटातून रेतीचा अवैध उपसा जोमात सुरू!

फाईल फोटो


  • रेतीमाफीयांना तालुका प्रशासनाचा पाठिंबा ? कारवाई करणार कोण जनता सभ्रमात !

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक 05 डिसेंबर 2023 : तालुक्यातील ग्राम फुटाळा येथील चुलबंद नदीच्या रेती घाटातून मोठ्या प्रमाणात राजरोष पणे अवैध रित्या वाळूचा उपसा सातत्याने सुरू आहे. विशेष म्हणजे या रेती घाटामध्ये जेसीबी द्वारे रस्ता तयार करून मोठ्या प्रमाणात सायंकाळी 06 वाजेपासून तर सकाळी 06 वाजेपर्यंत रेतीचा उपसा राजरोसपणे केली जाते. यापूर्वी याच घाटातून मोठ्या प्रमाणात 3 ते 6 कोट्यावधी रुपयाची रीती चोरीला गेली होती.

यावर अनेक बातम्या प्रकाशित करून सुद्धा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नव्हती. तोच प्रकार पुन्हा या भागात घडत असल्यामुळे प्रशासन निद्रा अवस्थेत आहे की काय ? असा सवाल स्थानिक जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वाळू माफियांची पाठ राखण न करता तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यातून केली जात आहे.

यापूर्वी फुटाळा गावांमध्ये अनेक वेळ रेतीमाफियांचे ट्रॅक्टर आणि ट्रक गावकऱ्यांनी अडवले आहे. तसेच ग्रामपंचायत मध्ये ठराव देखील मंजूर करण्यात आल्याचे काही नागरिक चर्चे दरम्यान सांगतात. पण प्रशासन मात्र वाळू माफियांच्या वाहनावर कारवाई मात्र करीत नसल्याने चिंतेचा विषय ठरला आहे.

चुलबंद नदीच्या फुटाळा घाटातून निघणारी वाळू ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुख्य गाव मार्गातून काढली जाते. तसेच राष्ट्रीय महामार्ग ओलांडून फुटाळा गावाच्या दुसऱ्या बाजूला वाळूची डंपिंग केली जाते. रात्रभर सतत चालत असलेल्या वाहनामुळे गावकऱ्यांची झोप मोडते त्यामुळे गावकऱ्यांना नियमित हा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे कुंपण शेत खाते की काय ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध उपसा करणाऱ्या माफियांवर लगाम लावावा अशी मागणी होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें