सडक अर्जुनी, दि. 12 नोव्हेंबर : दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असा दिव्यांचा सण आहे. लक्ष्मी पूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते. ‘दिन दिन दिवाळी… गाई म्हशी ओवाळी… गायी म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या’…. ‘उठा उठा दिवाळी आली… मोती स्नानाची वेळ झाली’ अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की, समजावे, दिवाळी आता जवळ आली आहे.
आज 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात दिवाळी सन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच निमित्ताने लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत सौंदड येथे पहिल्यांदाच दिवाळी सन साजरी करण्यात आली.
या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण इमारतीला रोषणाई करण्यात आली. आणि गावातील नागरिकांनी सहभाग नोंदवून दिवे लावून दिवाळी साजरी केली. धन आणि ऐश्वर्याची मूर्ती असलेली लक्ष्मी मातेची पूजा करण्यात आली. ग्राम पंचायत भवनात पहिल्यांदाच लक्ष्मीपूजन दिवाळी साजरी करन्यात आल्याने पंचकृशित चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रसंगी सरपंच हर्ष मोदी यांनी नागरिकांना यश, समृद्धी आणि सुख शांती प्राप्त होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत मनोभावे पूजा संपन्न केली.
यावेळी संदीप मोदी अध्यक्ष व्यापारी संघटन सौंदड, सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी, उपसरपंच भाऊराव यावलकर, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, वर्षा शाहारे पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष चरणदास शाहारे, ग्रामपंचायत सदस्य कुंदा साखरे, प्रमिला निर्वाण, शुभम जनबंधू , रंजना भोई, खुशाल ब्राह्मणकर, अर्चना चन्ने, सुषमा राऊत, विजय चोपकर, ग्रामपंचायत शिपाई याकूब पठाण, प्रदीप जांभुळकर, रोशन हटकर, अतुल दोनोडे, लीला चांदेवार, यांचे सह अन्य गावकरी उपस्थित होते.