गोंदिया, दि. 01 फेब्रुवारी : पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल गोंदिया मध्ये माहे जानेवारी 2025 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस उप-निरीक्षक श्री. भोजराज वनवास कान्हेकर, यांचे निरोप सत्कार 31 जानेवारी रोजी पार पडले, सभारंभावेळी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांचे शुभ हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, सुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, तसेच पोलीस निरीक्षक, रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक, रामेश्वर पिपरेवार, यांनी केले. तर सदरचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, रामेश्वर पिपरेवार, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली.
