किड्स केअर इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांद्वारे वैज्ञानिक निरीक्षण

सडक अर्जुनी, दि. 01 फेब्रुवारी  : सौन्दड (ता. सडक अर्जुनी) स्थानिक पॅराडाईस किड्स केअर इंग्लिश स्कूल मध्ये कृतीशील शिक्षिका प्राची श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात वैज्ञानिक निरीक्षण कृती अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध कामे सोपविण्यात आली. या मध्ये विविध फळांचे, अन्नाचे बी मातीत पेरून त्याचे कालबद्ध निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले. मातीत बी पेरल्यानंतर रोपटे किती दिवसांनी तयार होतात, त्यांच्या वाढीसाठी देण्यात आलेल्या खतानंतर त्यांच्या विकासाच्या गतीवर कोणता परिणाम होतो.

रोपट्याला पूर्णपणे विकसित होण्यासाठी लागणारा कालावधी, वातावरणामुळे त्याचावर होणारा परिणाम इत्यादी गोष्टींची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी विश्लेषणात्मक लेख तयार करून शाळेच्या परिपाठात सादर केले. असे निरीक्षण केल्यास ज्ञानात भर पडत असून अनुभव वाढल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अश्या वैज्ञानिक कृती विद्यार्थ्यांनी सतत करत राहावे अशे आवाहन मुख्याध्यापिका राजेश्री राऊत यांनी केले, तर संचालक संतोष राऊत, शाळा प्रशासन अधिकारी मुजम्मील सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले.

Leave a Comment

और पढ़ें