लोहिया विद्यालयात संविधान गुण गौरव परीक्षेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

सौंदड, दि. 01 फेब्रुवारी  : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्य. विद्यालय सौंदड व रामदेवबाबा अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 3 जानेवारी 2025 ला घेण्यात आलेल्या संविधान गुणगौरव परीक्षेचा निकाल आज दि. 01 फेब्रुवारी रोजी शनिवारला संस्थापक संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने घर घर संविधान या उपक्रमांतर्गत संविधान गुणगौरव परीक्षेचे बक्षीस वितरण संस्थेचे उपाध्यक्ष आ.न. घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी प्रमुख अतिथीं म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षक मा. डी. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक मा. आर. एन. अग्रवाल, स. शि. कल्पना काळे आदि उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक यांनी विद्यार्थ्यांना संविधान गुण गौरव परीक्षा विषयी सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या हस्ते वर्ग 6 ते 8 या गटातून प्रथम जस्मित सुदेश शहारे, 9 ते 12 गटातून तारेश विजय कोरे, डी. एल. एड . मधून अनिशा सूर्यभान आगाशे यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच द्वितीय 6 ते 8 गटातून नकुल विनोद मेंढे , 9 ते 12 गटातून पार्थ प्रशांत नगरकर या विद्यार्थ्यांना कास्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय 6 ते 8 गटातून हिमांशि गौतम भैसारे, 9 ते 12 गटातून चंद्रशेखर कार्तिक सोनटक्के या विद्यार्थ्यांना रौप्यपदक व प्रमाणपत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स. शि. यू. बी. डोये यांनी केले तर आभार स.शि. वाय. एम. बोरकर यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें