सडक अर्जुनी, दी. 31 जानेवारी : पॅराडाईस किड्स केअर इंग्लिश स्कूल सौन्दड येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन एका विशेष बाबीमुळे प्रशंसनीय ठरला असून पंचक्रोशीत त्याची चर्चा सुरु आहे. झाले असे कि सामजिक व राष्ट्रीय बांधिलकी पाळत शाळेच्या प्रशासनाने जुनी परंपरा मोडीत काढून एका वंदनीय परंपरेची सुरुवात करून झेंडा वंदनाचा मान समाजातील अति वंचित घटकातील व्यक्तीला देऊन देशाला नवीन संदेश दिलेला आहे.
झेंडा वंदनाचा मान विशेष, प्रभावशाली व्यक्ती, राजकीय पुढारी, किंवा संचालकांना देण्यात येतो. पण सदर शाळेने हि परंपरा मोडीत काढून गावातील अतिशय संघर्षमय जीवन जगून, २४ विश्व दारिद्र्यात घालवलेल्या व सर्वच सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या एका भाजी विक्रेत्या महिला बिंदुताई कोटागले यांना झेंडा फडकविण्याचा मान देऊन नवीन उदाहरण स्थापित केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे माजी सरपंच लालचंदजी खडके, विशेष पाहुणे बिन्दुताई कोटांगले तर मनजित कौर बल, सेवक शहारे, प्रा. हरणे सर, मानवेंद्र सरकार, उमेश सानेकर, नरहरी राऊत व इतर मान्यवर प्रामुख्याने हजर होते. हितगुज करत असतांना ध्वजवंदनाची हि नवीनच संकल्पना पाहून विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकवर्ग व गावकरी यांना आनंद झाल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
